About Us
BeingWithYou HELP Foundation द्वारा दिनांक १९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ ते ८ यावेळेत "प्रथमोपचार कार्यशाळेचे ( First Aid Workshop) आयोजन
निर्माण अजिंक्यतारा सोसायटी, वडगाव बुद्रुक, राजगड हॉस्टेल समोर, सिंहगड कॉलेज जवळ, पुणे -41 येथे करण्यात आले आहे.
"अपघात" कोठेही घडु शकतात घरात, बाहेर, ऑफिस मधे. अपघातात सापडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविण्या साठी एक "सकारात्मक पाउल" टाका....
विविध स्लाईड्स व प्रात्यक्षिका द्वारा आंतरराष्ट्रीय संस्था मान्यताप्राप्त प्रशिक्षक डॉ. मंदार अक्कलकोटकर यांच्या मार्गदर्शना खाली
"प्रथमोपचाराचे" शास्त्र शुध्द प्रशिक्षण घ्या आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचवा....

प्रशिक्षणातील महत्वाचे विषय
- प्रथमोपचार पेटी
- अपघात ग्रस्त व्यक्तीला मदत करतांना पाळावयाचे प्रोटोकॉल.
- प्रथम आपल्या सुरक्षीततेची काळजी कशी व का घ्यावी
- रस्त्यात, ऑफिस मधे, घरी जर अपघात झालाच तर इतरांची मदत घेऊन १०८ ला फोन कसा करावा याची माहीती.
- १०८ ला फोन केल्या नंतर काय काळजी घ्यावी
- अपघात ग्रस्त व्यक्तीशी संवाद साधुन व्यक्ती शुध्दीवर अथवा बेशुध्द आहे याची खात्री करणे
- रक्त स्राव होत असेल तर कशी काळजी घ्यावी
- अपघातात अवयव तुटला असेल तर तो अवयव हॉस्पिटल मध्ये पोहचे पर्यंत कसा सुरक्षित ठेवावा.
- भाजलेल्या व्यक्तीची कशी मदत करावी
- सर्प दंश किंवा मधमाशा चावलेल्या व्यक्तीची कशी काळजी घ्यावी
- अपघातात हाड मोडले असेल तर त्यास कसा आधार देउन त्या अवयवाची कमीत कमी हालचाल कशी करावी त्याचे प्रात्यक्षिक
- घशात काहीतरी अडकले असेल तर ते बाहेर तसे काढावे प्रात्यक्षिक
- हृदय विकाराचा झटका आला आहे ओळखणे व त्वरीत उपाय योजना करणे
- स्ट्रोक किंवा पक्षाघात (पॅरेलिसीस) लक्षणे व त्वरीत मदत
- लहान बाळांचा CPR प्रात्यक्षिक
- BP, Shugar, Oxygen level चेक करणे
- CPR व तोंडाने श्वास देण्याच्या पध्दती प्रात्यक्षिक.